मला काय करायचे आहे ?
रोज सकाळी गजर लावून उठायचे .त्रासिक चेहऱ्याने गजर बंद करायचा. मग पुन्हा ५ मिनिटाने ,आता उठल्याशिवाय भागणार नाही म्हणुन वैतागत उठायचे .प्रातर्विधी आटोपून चहा करायचा .उभ्या उभ्याच प्यायचा .मग मुलांना उठवायचे .त्यांचे डबे करता करता त्यांचे आवरायचे .डबे भरून मुलीला शाळेत पाठवायचे .मग पतीराज आळस देत उठणार .२,४ गोष्टी त्यांना ऐकू जातील अशा बेताने पुट पुटत, "घरात माझ्याशिवाय, कोणीही इकडची काडी तिकडे करणार नाही", असे म्हणत पसारा आवरायचा. मग पुन्हा एकदा चहा ,नाश्ता सुरु. पति राज आटोपून ऑफिसला गेले की कपडे वॉशिंग मशीनला लावायचे. सासू बाई ,सासर्यांना चहा ,नाश्ता ........मग आपण नाश्ता खायचा .मग दुसऱ्या मुलाचा अभ्यास घ्यायचा .मग अंघोळ .मग २ मिनिटात पूजा .....पूजेतही ,नंतर काय काम करायचं याचा विचार.मग स्वयंपाक. दुसऱ्या मुलाला शाळेत पाठवायचे .मग कॉम्पुटर सुरु करून मेसेज पाहणे .मग फोन वरून वेळा ठरवणे .लोकांच्या समस्या ,अभ्यास करून ठेवणे .त्यावर उपाय लिहून ठेवणे. फोन वर नवीन वेळा घेऊन टायमिंग फिक्स करणे. मग घाईत जेवण करणे .मग थोडा वेळ फेसबुक. मग मुलगी ; शाळेतून येणार .मग तिचे जेवण . मग थोडा वेळ दोघींचा आराम .मग पुन्हा ४ नंतर आलेल्या लोकांशी बोलून त्यांचे समाधान करणे. एखाद्या व्यक्तीला जेव्हा त्याच्या समस्येचे उपाय सांगेन किंवा त्यांचे दडपण कमी करेन तेव्हा मनात एक आनंदाची लहर उमटते. .............मग पुन्हा संध्याकाळी मुलगा आला की त्याच नाश्ता .मग पुन्हा जेवण बनवणे .मग अहो येणार ...मग सर्वांची जेवणे ...मग मागचे सर्व आवरून एखादी T.V. वरची सीरिअल पाहे पर्यंत डोळे मिटायला लागतात .मग रिमोट नेच T.V. बंद करून आडवे व्हायचे. ...........पुन्हा सकाळी गजर ...........काय आहे हे ...........हे कोणते जगणे आहे... सतत रोज रोज ....तेच..........एक आहे; ......जगातल्या अनेक दुखी कष्टी लोकांपेक्षा आपले जगणे खूप चांगले आहे .पण..........मला अजून काहीच करायचे नाहीय का? असेच माझे आयुष्य जाईल की अजून काही करायचे आहे मला ........काही दिवसांपासून असा विचार सतत मनात येत होता.मग मी ठरवले एक दिवस दुपारी शांतपणे बसून मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवले. आता आपले आयुष्य किती आहे आणि सर्व गोष्टी जमतील की नाही ही गोष्ट निराळी .पण विचार तरी करून पाहायला काय हरकत आहे.
१) पहिली गोष्ट ; मला माझे शरीर सुदृढ बनवायचे आहे .निरोगी आणि उत्साही .......त्याकरिता मला रोज सकाळी फक्त अर्धा तास लवकर उठावे लागेल आणि थोडा व्यायाम आणि प्राणायाम करावा लागेल .
२) दुसरी गोष्ट मला माझ्या आयुष्यात नव नवीन देश आणि जागा पहायच्या आहेत .आणि त्यावर माझे अनुभव माझ्या वाचकांकरिता लिहायचे आहेत. ज्यातून त्यांना आनंद मिळेल आणि मार्गदर्शनपण . आता ही माझी अतिशय प्रामाणिक इच्छा आहे या करिता खूप उशीर करून चालणार नाही कारण शरीर थाकायाच्या अगोदर म्हणजे किमान ५० ते ५५ वयाच्या च्या अगोदर .......पण याकरिता भरपूर पैसे लागतील जे माझ्याकडे नाहीत. .पण मी काही भाग काटकसर करेल .आणि जे माझे मित्र मैत्रिणी परदेशात राहतात .त्यांच्यापैकी ज्यांच्याकडे मी आणि माझे पति ४, ५दिवस राहू शकू .अशा मित्र मैत्रिणीची मदत घेणे.
३)तिसरी गोष्ट जेवढे थोडे फार अध्यात्मिक वाचन झालेले आहे आणि जेवढे माझ्या गुरुनी सांगितले आहे त्याप्रमाणे रोज किमान अर्धा तास ध्यान धारणा किंवा आत्म परीक्षण करून स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे. माझी मुले मोठी झाल्यावर या करिता वेळ काढू .असा विचार पहिल्यांदा आला .पण अध्यात्म सांगते की उद्या कधी उगवत नाही .आजच आहे .म्हणुन जेव्हा जमेल तसे पण लगेच सुरु करणार.
४)माझ्या मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांना त्याच्या पायावर उभे करणार .या करिता मात्र प्रत्येक क्षणी दक्षच राहावे लागेल .पण नंतर मात्र त्यांच्या संसारात लुडबुड करण्यापेक्षा अळवावरच्या पाण्याप्रमाणे संसारात असून नसल्यासारखे परमेश्वराच्या आराधनेत जीवन घालवणार. असे सध्या तरी डोक्यात आहे .........पाहू पुढे काय काय आहे ..........मला वाटते प्रत्येकाने अशी जर स्वतःच्या जीवनाची उद्दिष्टे लिहून काढली तर जीवन म्हणजे आला दिवस गेला दिवस असे ना राहता, ते आपल्या उदीष्ट पर्यंत पोहोचण्याचा मार्ग बनेल आणि माणूस म्हणून जन्माला आल्याचे सार्थक होईल ."या सर्व गोष्टीत कटाक्षाने सातत्य ठेवणे महत्वाचे आहे ".वरील गोष्टी या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक उद्दिष्टे आहेत पण याचा अर्थ असा नाही की ती आदर्श आहेत किंवा तशीच असावीत .पण जी असतील आणि त्याकरिता आपल्याला काय काय करावे लागेल याचा जाणीवपूर्वक विचार करा आणि त्याप्रमाणे वागा .आणि ज्यांना माझा हा विचार आवडला त्यांनी मला नक्की सांगा.
No comments:
Post a Comment