तीर्थ क्षेत्र देहू
काल बऱ्याच दिवसांनी देहू गावाला गेलो होतो. संध्याकाळ अतिशय शांत ,समोर संथ वाहणारी इंद्रायणी नदी .रात्री घरी परतणाऱ्या पक्षांची लगबग ,तुकारामांनी ३५० वर्षांपूर्वी जागवलेला विठ्ठलाच्या अगाध भक्तीचा मळा ,आणि त्या खोल डोहामध्ये बुडालेल्या आणि तुकारामंची १३ दिवस कठोर परीक्षा घेऊन पुन्हा जशाच्या तशा मिळालेल्या अमृत मयी अभंग गाथा .सर्वानीच मनावर एक गूढ गंभीर फुंकर घातली होती .संध्याकाळी मंदिरात वाजणारे नगारे , खोल इंद्रायणी नदी आणि असंख्य विठ्ठलाच्या आणि तुकोबांच्या आठवणी मनात घेऊन ,त्या आठवणींचे तरंग स्वतःवर उमटत ;त्या नदी समोर बसलेली मी . असा वाटत होत की पुन्हा त्या संसारात जाऊच नये .इथेच विठ्ठल नामाचा गजर करत त्या परब्रम्हाशी एकरूप व्हावे .
No comments:
Post a Comment