मुंगी उडाली आकाशी
वेळ पहाटे सव्वा तीन .मंद आवाजात गजर होतो .जरी मंद आवाजात असला तरी निद्रादेवीच्या कुशीत शिरलेल्यांना उठवण्याचे सामर्थ्य बाळगून असतो .पटकन अंगावरचे पांघरूण सारून मी उठले .भर भर आवरून चहा टाकला. चहाचे दोन कप हातात घेऊन आले ,त्याच्या हातात एक ठेवला .आयत्या वेळेला आठवलेल्या एक दोन वस्तू ,पटकन पर्स मध्ये टाकल्या .अंघोळ उरकून bag बाहेर आणून ठेवली.
उबदार गादीत पहुडलेली माझी ११ महिन्यांची लेक . तिच्या शेजारी झोपलेला तिचा दादा ,आणि त्यांच्या शेजारी झोपलेली त्यांची आजी .छोटीचा पापा घेऊन ,त्यांच्यावरून मायेची नजर फिरवून मी निघाले .तो ही तयार होताच .दोघा चिमण्यांना आजी आजोबांकडे सोपवून आम्ही निघालो . मुंबई असली तरी पहाटे ४ वाजता जाणवणारा सुखद गंभीर गारवा अंगावर झेलत आम्ही विमानतळावर पोचलो .तेथे आवश्यक ते सोपस्कार उरकले .बाहेर अजूनही अंधार.... काही वेळातच विमानात बसण्याची वेळ झाली आपल्या सारख्या कधीतरीच विमानात बसणार्यांना अजूनही विमान प्रवासाची अपूर्वाई वाटतेच . आपण जरा कोणी स्पेशल आहोत असे वाटेपर्यंत विमानतळावरची गर्दी आपल्याला पुन्हा जमिनीवर आणून सोडते . तरीही थोड्याशा जोशात विमानात पाऊल टाकले .खिडकीजवळची जागा मिळाली होती . अजूनही प्रत्येकाच्या मनात असलेलं लहान मुल खिडकीजवळची जागा मिळताच आनंदत. मी पुढे जाऊन खिडकीशी बसले .तो सावकाश ऑफिसची bag सावरत माझ्या शेजारी बसला .मझा हा जरी काही पहिला विमान प्रवास नव्हता तरी खिडकीतून मान इकडे तिकडे वेळावून पाहीले .१०,१२ विमाने बाहेर उभी होती .अगदी आपल्या S.T. stand वरच्या बस सारखी. १० ,१५ मिनिटे झाली विमान उडण्याचे लक्षण दिसेना .प्रवासी येऊन बसत होते .कोणी काही वस्तू मागत होते .आता मात्र पहाटे कडून चोरलेली झोप हळूच डोळ्यात परतू लागली .जरा डोळे मिटताहेत तोवर डोळ्यापुढे विचार दृश्ये साकारू लागली .
माझ्या मिस्टरांची बदली झाली नागपूर येथे .आता नागपूर म्हणजे जबरदस्त उन्हाळा . अगदी लहानपणापासुन नागपूर म्हणजे तप्त उन्हाळा हे चित्र डोळ्यासमोर असल्याने मी खूप वैतागले होते या बदलीकरिता .त्यातून मी पुणेकर ,बदलीमुळे २, ३ वर्षे मुंबईत काढलेली ,पण आता पुन्हा नागपूरच्या उन्हाळ्यात जायला अगदी नाखूष होते .आता मुलांची शाळा बदलावी लागेल. घर बदलावे लागेल . यांचे साहेब म्हणले आधी मुलांच्या अडमिशन करा . म्हणून मग आम्ही चाललो होतो .आता तो म्हणत होता की तुला हिवाळ्यात नेतो तिथे म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन चांगले होईल .पण काही ना काही कारणाने ढकलले गेले आणि आम्ही आता निघालो होतो मार्च मध्ये .....
अचानक एक छोटासा धक्का बसला .विमान हळू हळू रनवे वर पुढे जाऊ लागले .तिथल्या तिथेच २, ४ चकरा मारून मेन रनवे वर आले आणि आकाशात उडण्याकरिता सज्ज होण्याकरिता जशी छातीत हवा भरून घ्यावी तसा जोरात आवाज करत जोरात पळू लागले ,......जोरात ,....जोरात ,......अजून जोरात .........क्षणार्धात माझ्या डोळ्यापुढे माझे छोटे बाळ आले मुलगा आला .आता विमान जमिनीशी संपक सोडेल. कदाचित माझासुद्धा या जमिनीशी शेवटचा संपर्क असेल का? ती दोघ मला परत दिसतील ना ? असे विचार डोक्यात काहूर माजवू लागले डोळ्यांमध्ये भरलेलं पाणी आत जिरवत बाहेर पहाते तोपर्यंत विमान आकाशात झेपावले .आतापर्यत रनवे वर होणारा चाकांचा आवाज क्षणार्धात थांबला. मोठ्या इमारती लहान दिसू लागल्या शेजारच्या धारावी झोपड पट्टीची छपरे क्षणार्धात चपटी दिसत नजरे आड झाली विमान अजून उंच उडाले आणि शक्य तितकी मान वाकवत मी बाहेर पाहीले .आणि अचानक समुद्र दिसला .ही नदी आहे, तलाव की समुद्र ..........तो समुद्रच होता भारताच्या नकाशावर डावीकडचा भाग निळ्या रंगाने भुषवणारा ,....अरबी समुद्र .विमानातून दिसणारी ती किनार पट्टी पाहताच मी आनंदाने म्हणाले ,अरे हे बघ इकडे समुद्र बघ . तो नुसताच हसला .त्याचा बऱ्याच वेळेला विमान प्रवास झाल्याने त्याला त्याचे अप्रूप नव्हते .मग मी एकदम गप्पच बसले . दहा ,पंधरा मिनिटांनी खिडकी बाहेर बघता बघता पिंजलेल्या कापसाच्या अपरंपार राशी दिसू लागल्या उबदार पांढऱ्या कापसाच्या उशाच जशा, असे वाटू लागले .आणि या पूर्ण अवकाशात आपले काय स्थान आहे, असे वाटू लागले . माणूस क्षणाक्षणाला करतो हेवेदावे माझे ,तुझे, मी आणि माझेच सर्व .पण या आसमंतात मी कोण आहे ? काय आहे हे परब्रह्म तत्व . माझे मन त्या अनंताचा विचार करू लागले. या संसाराचा या जगाचा इतका मोह सर्वाना का वाटतो ?या ढगात ,या आकाशात ,या परमेश्वराच्या कुशीत किती आनंद आहे.जे कणाकणात भरून राहिले आहे .ते हेच परब्रह्म तत्व आहे मी तिचाहे ,त्यातलीच आहे गरज आहे फक्त समजून घेण्याची या अनंतात विलीन होण्यास मी आता अगदी तयार आहे ,अशा विचारत मी काही काळ हरवून गेले .
तेवढ्यात टी....... कॉफी .....अशा आवाजाने मी भानावर आले .थोडा चहा ,नाश्ता घेऊन मी पुन्हा विचारत गढले .कसे व्हायचे या नागपूरच्या उन्हाळ्यात ? माझी चिमणी लेकरं या उन्हाळ्यात सुकतील ना .का बर मला याव लागतंय इकडे ? असा विचार करेपर्यंत ७ वाजले .विमान थोडे खाली आले .पण जमिनीवर ऊन आहे असे वाटेना . त्याला म्हणाले तर तो म्हणाला ,आपण लवकर उठलोय म्हणून काही सूर्य लवकर उगवून लवकर ऊन येणार आहे का? एवढ्या सकाळी ऊन पडत नसतं. मी आपला मानेनच होकार दिला .हळूच विमान जमिनीच्या दिशेने झेपावले . मुंबईच्या मानाने अगदीच कमी वस्ती वाटू लागली . चाके जमिनीला टेकली विमानाचे दरवाजे उघडले .चला आता उन्हाची तलखी सहन करायला ,असेम्हनात मी दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकले ........तर काय ???????????? हवा इतकी गार जसा पुण्यातला हिवाळा ........ आणि सगळीकडे पाऊस पडलेला ......अरे मार्च महिन्यात पाऊस कसा ? मी विचारमग्न झाले ...........थोड्या वेळापूर्वी इथल्या उन्हाळ्याच्या कल्पनेने घाबरलेली मी ,,त्या परमेश्वराची अनुभती घेणारी मी आणि काही वेळात इथे झालेला गारवा .........काय आहे या विश्वात्म्याची ताकद ??????/जरी वाटला मनाचा खेळ ,तरी या मनातच असलेला एक कण नी त्या परमात्म्याचा अंश हे एकच आहेत .तर काय साधणार नाही त्याला .......फक्त हवा विश्वास त्याच्यावर, त्याच्यातल्या माझ्यावर आणि माझ्यातल्या त्याच्यावर